प्रतिनिधी : स्वाती हडकर
गुहागर : गुहागर तालुक्यातील तवसाळ गावामध्ये अशोका कंपनीचे डिझेल वाहतूक करणारा ट्रेकर पलटल्याची गंभीर घटना घडली आहे.
या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिझेल वाहतूक करणारा ट्रेकर अचानक पलटल्याने हा अपघात घडला.
या अपघातात वाहनातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहनाचा चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
या घटनेचा पुढील तपास गुहागर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
