
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:सध्या आपल्या देशात आणि देगलूर तालुक्यात जनावरांवर लम्पी हा आजार पसरत आहे..मुके जीव बोलत नाहीत आणि त्यांच्या वेदना पाहवत नाही..
शहापुर सर्कल आलुर येथे जनावरांना लम्पी आजार पसरत आहे.पशुवैद्यकिय अधिकारी यांनी एक डोस गावातिल सर्व जनावरांना लम्पी डोस दिले.पण आलुर गावात अजुण लम्पी हा रोग जनावरांना दिसत आहे.व वाढत आहे.आम्ही या सम्बंधीत सर्कल शहापुर येथे पशुवैद्यकिय अधिकारी यांना फोणद्वारे सुचना करुण सुद्धा अधिकारी गावात भेट देत नाहीत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातिल सर्व जिल्ह्याधिकार्यांना व जिल्हा पशुवैद्यकिय अधिकार्यांना सुचना देऊण सुद्धा फोण केल तर पशुवैद्यकिय अधिकारी व्यवस्थित फोणवर बोलत नाहीत,दवाखान्यात गेल तर कोणी राहत नाही.गावातिल लोकांमद्ये भितीच वातावरण निर्माण झालेल आहे.व अगोदरच निसर्गाण मोठ संकट शेतकऱ्यांसमोर आणुण ठेवलेल आहे.ऐवढ्यात अजुण जनावरांच संकट शेतकऱ्यांसमोर आलेल आहे.सम्बंधीत अधिकारी व लम्पी आजाराबाबत शासनाने नेमुण दिलेले गावातिल व सर्कल मधिल अधिकार्यांनी वेळीच दखल घेऊण लम्पी रोग आजार बाबत अजुण एक वेळेस लसीचे कॕम्प गावातिल जनावरांना लस देण्यात यावे अशी गावकर्याकडुण मागणी होत आहे.
शेतकरी बंधूंना विनंती हातातले कामं टाकून पहिले आपल्या लाडक्या जनावरांचे लसीकरण करून घ्या..