
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अकोला (प्रतिनिधी):- श्रीनाथ वृद्धाश्रम मध्ये संग्रामपूर येथील शंकरलाल मोहनलाल पुरोहित गटनेते नगरपंचायत संग्रामपूर यांनी आपल्या संपूर्ण सहकारी सोबत येऊन श्रीनाथ वृद्धाश्रम दहिगाव येथे दिवाळीचे फराळ व फळे तसेच लाभार्थ्यांना स्वेटर व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. प्रसंगी संस्थेच्या वतीने श्री.इंगळे यांचे शाल श्रीफळ व देऊन संस्थेचे संचालक विजयकुमार धरणार तसेच वृद्धाश्रमाचे अधिक्षक मनोज शर्मा यांनी सत्कार केला. गटनेते, शंकरलाल पुरोहित आणि त्यांचे सहकारी यांनी अबाल वृद्धांशी आस्थेने संवाद साधला. यावेळी श्रीनाथ वृद्धाश्रम यांनी त्यांचे आभार मानले.