
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा : – झुंजार क्रांती सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत रेल्वे टेशन बस स्टॉप वरील गरीब ज्यांना घर नाही ज्यांना स्वतःचं अस्तित्व नाही.
पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र संघर्ष करणाऱ्या अशा गरीबातील गरीब लोकांना बस स्टॉप वर राहणाऱ्या लोकांना संघटनेच्यावतीने थंडीचे दिवस असल्यामुळे बेडशीट देऊन सामाजिक बांधिलकी जपली
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. अनिल होळगे, संघटनेचे सचिव गजानन चावरे, नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील शिंदे, मनोज जमालपुरे, संभाजी नगर युवा नेते नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख कोंडीबा राजकौर, लोहा तालुका संघटक प्रकाश कंधारे, विविध कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होऊन मदतीचा हात पुढे करत समाजातील गोरगरीब लोकांना मदत केली आहे.