
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:तालुक्यातील कासराळी येथे बिलोली उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व नायगाव, रामतीर्थ व बिलोली पोलीसांनी कासराळी येथे दि. २८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा मारून एकूण २० आरोपी ताब्यात घेतले आहेत.
त्यांच्याकडून एक लाख ४ हजार रुपये नगदी व एकूण मोबाईल ज्यांची किंमत ७६००० तसेच ११ मोटरसायकली ज्याची किंमत ४ लाख असा ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरील ‘जुगाराच्या छाप्यामध्ये सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे, सहायक पोलीस निरीक्षक रामदास केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक बाच्चावार, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गंगाधर केंद्रे, पोहेकाँ मुस्तापुरे, पोहेकाँ देगलूरकर, पोहाँ आडे, पोहेकाँ शिंदे, गाजुलवाड, पोलीस नाईक सोनकांबळे, पोलीस नाईक इबितवार, पोकाँ रिंदकवाले, मुदीराज आदींनी कामगिरी बजावली आहे.
सदर प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रामदास केंद्रे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. २१७/२०२२, कलम १२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार बिलोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ गोविंद शिंदे हे करीत आहेत.