
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
हा नामामृत या नामदेव महाराजांच्या चरित्र ग्रंथास म्हणजेच, सौ मीनल अविनाश कुडाळकर आणि उषाताई गजानन पोरे. यांच्या या चरित्र ग्रंथास समृद्धी प्रकाशन हिंगोली यांच्याकडून पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर श्रीराम कऱ्हाळे हे असून शिवाजी महाविद्यालय हिंगोली यांच्यातर्फे देण्यात येत आहे. अनेक दिग्गज लेखकांना अनेक पुरस्काराने सन्मानित करत असताना, नामामृतला हा तिसरा पुरस्कार मिळत आहे. त्यामुळे दोन्ही लेखिकांना त्यांच्या, नामदेव महाराज 751 वी जयंती निमित्त प्रकाशित झालेल्या पुरस्काराचा, उद्देश हा होता की नामदेव महाराज हे संत साहित्यिक साहित्याचे शिरोमणी, संतांचे शिरोमणी ,आद्यकीर्तनकार, पहिले अभंग रचनाकार ,आणि थोर समाजसेवक पंजाब, राजस्थान, गुजरात घुमान इथपर्यंत जाऊन त्यांनी धर्माचा प्रसार केला आणि समाजाची जनजागृती केली.जीवन जगण्याचे कौशल्य लोकांना ते शिकवत होते.प्रेमाचा भांडारी,देवाचा लडीवाळ भक्त ही त्यांची ख्याती होती.त्यांचे कार्य महान होती.जनमानसात नामदेव महाराज रुजवण्यासाठी, नामामृत नामाचे अमृत वाचकांनी प्राशन करावे. हा उद्देश असताना नामदेव महिला परिषद या या संस्थेचे कार्य पुढे नेण्यासाठी, म्हणजेच मुलींना शिष्यवृत्ती देत असताना, अनेक वर्षे हे कार्य उत्तम रित्या चालले होते .परंतु कोणी कोविडच्या काळात कोविडच्या काळात ठप्प झालेले ,निधी संकलन करणे. या कार्यात पुस्तक रुपी आपणही सहभागी व्हावे असे. या दोन लेखिकांनी मनोदय बाळगला. आणि यातून मिळालेला काही निधी होतकरू मुलींच्या साठी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला .आणि त्या प्रयत्नात अनेक महिलांनी त्यांना सहकार्यही केले. परंतु समाजातील प्रत्येक ठिकाणी हे नामाचे अमृत पोहोचावे यासाठी त्यांचा अजूनही प्रयत्न चालू आहे.
नामदेव महाराजांचा जन्म त्यांचे बालपण त्यांचे सामाजिक जीवन, तीर्थावळी ,तीर्थवळीचा अनुभव, आणि त्यांच्या समाधी सोहळा इत्यादी गोष्टी वाचकांनी आणि अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनाही उपयोगी पडेल असा हा ग्रंथ 151 पानांची निर्मिती करण्यात आली .आणि त्याची किंमत 145 जरी असली तरी महाराजांच्या या जन्मोत्सवासाठी त्यांनी 80 रुपये प्रत अगदी नाममात्र किंमतीत देण्याचा प्रयास केलेला आहे. या त्यांच्या समाजकार्यात सर्वांनी सहभागी व्हावे. अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असल्याने आणि अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमापैकी हा कार्यक्रम त्यांनी आपल्यापुढे मांडला आहे .मीनल कुडाळकर यांची अनेक अभियानं आहेत ,त्यामध्ये पुस्तक आपल्या दारी हे अभियान त्यांनी मोठ्या प्रमाणात राबवले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कार्यक्रमानिमित्त दिले जाणारे बुके ,गिफ्ट ,वाढदिवसानिमित्त दिले जाणारे चॉकलेट्स, इत्यादी हे आपण व्यर्थ पैसे घालवतो काही काळाने ते डसबीनकडे वळतात. त्या ऐवजी कमी पैशात परंतु एक संग्रहात भर टाकणारा हा ग्रंथ आपण लहान मुले ते मोठी माणसे यांच्यापर्यंत पोहोचवून, एका चांगल्या अभियानात सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळत आहे .आणि ती आपण यथायोग्य सार्थ करावी .आणि समाजकार्यात सहभागी व्हावे