
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील शरनिरा नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक लागली असून दि.०३ नोव्हेंबर २०२२ रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती तर दि.०४ नोव्हेंबर २०२२ रोजी फॉर्म छाननीची तारीख होती यात कुठल्याही त्रुट्या व आक्षेप नसून एकूण २९ अर्ज दाखल झाले.आता सहकार क्षेत्रातील रणांगणात किती उमेदवार तठस्थ राहतील याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.
सविस्तर असे की २५ वर्षापासून कार्यरत असलेल्या संचालक मंडळाची या पतसंस्थेमध्ये आजपर्यत सत्ताधारी पॅनल सतत कार्यरत आहे.यावर्षी मात्र संस्थेत सभासदांचा मुक्तपणे प्रवेश झाल्यामुळे सभासदांची संख्या वाढली असून त्यामुळे यावेळेस प्रथमच या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
शरनिरा पतसंस्थेच्या पथ्रोट व कापुसतळणी ह्या ग्रामीण भागात शाखा असून सत्ताधारी पॅनलने कोणासही प्रतिनिधित्व दिले नाही.याची ग्रामीण भागात नाराजी दिसून आली.मात्र यावेळेस प्रथमच नवीन पॅनलने ग्रामीण भागातील ३ सभासदांना संधी दिली असून त्याबद्दल ग्रामीण भागात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार अर्ज मागे घेण्याकरिता भरपूर वेळ असल्यामुळे किती सभासद अर्ज मागे घेतात व रिंगणात किती राहतात यावर पुढील दिशा निश्चित होणार आहे.निवडणूक दि.४ डिसेंबर रोजी होणार असून लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.