
उद्धव ठाकरेंनी 48 तासानंतर चुप्पी तोडली; कदमांना शिवसेना स्टाईल प्रत्युत्तर !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दसरा मेळाव्यामध्ये गंभीर आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाचा बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस छळ केला, असे रामदास कदम यांनी मेळाव्यात म्हटले होते.
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे हाताचे ठसे घेतल्याचा देखील आरोप रामदास कदमांनी केला होता. रामदास कदम यांच्या आरोपानंतर याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला.
मात्र याबाबत उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती याबाबत उद्धव ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमास भाष्य केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मी गद्दार आणि नमक हरामांवर बोलत नाही. रामदास कदम हे हरामखोर आणि नमक हराम आहे त्यामुळे त्यांच्या प्रश्नावर उत्तर देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणजे काय आहे ते सबंध महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे अशा गद्दार आणि नमक हराम व्यक्तींच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नाही. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या काही काळामध्ये अनेक जण शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांना सोडून इतर पक्षांमध्ये गेले आहे. त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध होते त्यामुळे ते सोडून गेल्याने मला त्रास होतो का? असं उद्धव ठाकरे यांना विचारला असता ठाकरे म्हणाले, सोडून गेलेला व्यक्तीनी टीका केल्यानंतर त्रास आणि वेदना होतेच परंतु त्याच वेळेला शिवाजी पार्कमध्ये हजारो लोकं पावसात भिजत माझं भाषण ऐकतात ते या वेदनांवरती रामबाण औषध असतं.
शिव्या देणाऱ्या पेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात हे अधिक महत्त्वाचे असतात आणि ते हात कितीतरी पटीने माझ्या पाठीशी आहेत. म्हणून तर मी उभा राहू शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.