
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कारेगाव:- महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी मोहत्सवा निमित्त कारेगाव येथे १३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नामांकीत भिमशाहीरांचा सन्मान सोहळा व शाहीरी जलशाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथुन जवळच असेलेल्या कारेगाव येथील नालंदा बौध्द विहाराच्या प्रांगणात दि.13/11/2022 रोजी सायंकाळी 7=00 वाजता रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी मोहत्सवा निमित महराष्ट्रातील नामांकीत भिमशाहीरांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्याचे उद्घाटक नांदेड दक्षीणचे विद्यमान आमदार मोहन आण्णा हंबर्डे आसुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे मराठवाड अध्यक्ष माधवदादा जमदाडे हे राहणार आहेत. तर मुख्य अतिथी चित्रपट अभिनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल मोरे हे उपस्थीत राहणार आहेत तर भिमशाहीरी जलसा या सांस्कृतीक कार्यक्रमाचे अध्यक्षपदी विद्रोही प्रबोधनकार व आंबेडकरी घराण्याचे कट्टर समर्थक कैलासदादा राऊत हे उपस्थीत राहणार आहेत. महाकवि वामनदादा कर्डक जन्मशताब्दी मोहत्सवा निमित्त महाराष्ट्रातील सर्व नामांकीत भिम शाहीरांचा स्म्रतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांच्या हस्ते सन्मान करून भिम शाहीरांचा गौरव करण्यात येणार आहे. व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन आंबेडकरी चळवळीचे लढवय्ये नेते गंगाधरराव महाबळे, नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक बालाजीराव खिल्लारे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. मारोती सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, प्रख्यात कवि व लेखक बा. पु. गायखर, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, नगरसेवक तथा काँग्रेसचे गटनेते पंचशिल कांबळे, रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष मधुकरराव झगडे, नगरसेवक करीम शेख,इंजि.शिवाजी वाघमारे,नगरसेवक नबि शेख,नांदेड दक्षीण जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप मगरे, ॲटो युनियन जिल्हाध्यक्ष विलास मगरे, आदी उपस्थीत राहणार आहेत.तरी लोहा तालुक्यातील सर्व जनतेने या भिमशाहीरी जलसा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा संघटक तथा कार्यक्रमाचे आयोजक अनिलदादा गायकवाड व रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष सखाराम सोनवणे यांनी केले आहे.