
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे उद्या दिनांक 6 नोव्हेंबर पासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून नांदेड
जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. या बैठकीस शिवसेनेच्या आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांनी व आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या
अनुषंगाने तयारी करणे, शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला शिवसेनेचीपुनर्बांधणी करणे व शेवटच्या घटकापर्यंत आणि गाव वाडी तांड्यावर शिवसेनेची ध्येयधोरणे पोहोचवत आगामी काळात
शिवसेनेला अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी पाच वाजता नांदेड येथे आगमन होणार आहे. त्यानंतर दहा वाजता किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची माहूर येथील शासकीयविश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजता हदगाव विधानसभा मतदारसंघासाठी हादगाव येथे ते बैठक घेतील तर सायंकाळी साडेपाच वाजता भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर, मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी ते शासकीय विश्रामगृह भोकर येथे संवाद साधणार आहेत. सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता लोहा विधानसभा मतदारसंघातील लोहा आणि कंधार तालुक्यातील शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची कंधार येथे वसंतराव नाईक सभागृह पंचायत समिती येथे ते बैठक घेतील. दुपारी एक वाजता मुखेडविधानसभा मतदारसंघासाठी मुखेड येथे शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी चार वाजता नायगाव आणि देगलूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी शिवसैनिकांशी ते संवाद साधणार असून या धर्माबाद, नायगाव, उमरी, देगलूर, बिलोली तालुक्यात या पदाधिकाऱ्यांशी ते हितगुज करणार आहेत. ही बैठक नरसी येथे भिलवंडे फार्म हाऊस वर पार पडणार आहे. मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकाशी संवाद साधण्यासाठीशासकीय विश्रामगृह नांदेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तर सकाळी 11 वाजता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संत ज्ञानेश्वर मंगल कार्यालय विणकर कॉलनी चौफळा येथे ते संवाद साधणार आहेत. ही बैठक संपल्यानंतर दुपारी एक वाजता बबनराव थोरात हे वसमतकडे रवाना होणार आहेत. बैठकांना माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार अनुसायाताई खेडकर हे उपस्थित राहणार आहेत. u या बैठकीस शिवसेनेच्या सह संपर्कप्रमुख, जिल्हा संघटक, जिल्हा समन्वयक, उपजिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुखसह संपर्कप्रमुख, जिल्हा संघटक, जिल्हा समन्वयक,
उपजिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख आणि तालुका संघटक, विधानसभा संघटक, शहर आणि तालुका समन्वयक, सहसंघटक, सह समन्वयक, उपमहा नगर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुख, शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख व महिला आघाडी, युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेना, युती सेना यांच्यासह आजी – माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी केले आहे.