
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : बॉलीवूडचा आगामी चित्रपट ‘उंचाई’ सतत चर्चेत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि नीना गुप्ता, परिणीती चोप्रा, डॅनी डेन्झोंगपा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपट हिट व्हावा यासाठी सर्व कलाकार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. यादरम्यान, ‘उंचाई’ चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली. जिथे बोमन इराणीने त्याचा को-स्टार अनुपम खेरबद्दल एक रोचक खुलासा केला आहे. बोमन इराणीच्या म्हणण्यानुसार, “अनुपम खेर यांना फ्लाइट प्रवासाचा फोबिया आहे आणि फ्लाइट सिक्वेन्स दरम्यान त्यांना विश्रांती घ्यावी लागली.”
सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘उंचाई’ हा चित्रपट उंचीभोवती फिरतो आणि तीन मित्रांची कथा सांगतो, जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते एव्हरेस्ट बेस कॅम्पवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. शूटमध्ये काही हेलिकॉप्टर उड्डाण समाविष्ट आहे त्यामुळे येथूनच चित्रपटातील कलाकारांना अनुपम खेर याच्या फोबियाबद्दल कळले.
कपिल शर्मा शोमध्ये खुलासा करताना, बोमन इराणी म्हणाले की, “जेव्हा तो हेलिकॉप्टरमधून उड्डाण करत होता तेव्हा त्याच्या नसा पॉप अप होताना दिसत होत्या” आणि ते पुढे म्हणाले की, “मी अभिनेत्याला दरराेज यातून जात असल्याबद्दल सलाम करताे. जेव्हा आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसायचो, तेव्हा तो समोर बसायचा आणि मी त्याला बरं वाटायसाठी मालिश करायचो आणि त्याला ‘तू ठीक आहेस का’ असे विचारत राहायचाे.”
अभिनेत्री सारिका हिने सांगितले की, “चित्रीकरणादरम्यान हेलिकॉप्टरमधून प्रवास करणे हे ऑटो-रिक्षात प्रवास करण्याइतकेच सामान्य आणि अनौपचारिक होते. “आम्ही दर चार दिवसांनी उंची बदलायचाे. सूरज बडजात्याजी यांनी आम्हाला काठमांडूला पाठवले असताना आम्ही ऑटोरिक्षाने प्रवास केला होतो.”
सारिका पहिल्यांदाच कपिल शर्मा शोमध्ये आली होती. ‘उंचाई’ हा चित्रपट यावर्षी 11 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे.