
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा इतर राज्यात चालू आहे.
सात नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला आहे. आ. राजेश राठोड यांच्याकडे हिंगोली जिल्हा निरीक्षक म्हणून जबादारी देण्यात आली आहे. तसेच संस्कृतीक कार्य समितीवरही निवड त्यांची निवड आहे. मंठा तालुक्यातील आ राठोड यांच्या नेतृत्वात अनेक कारकर्ते यात्रेत सहभागी होणार आहेत. नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला बुलढाणा मार्गे भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात जाणार असून महाराष्ट्रात सोळा दिवस यात्रेचा प्रवास राहील. देशात शांतता, एकोपा, बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी तसेच जनसामान्यांचा न्याय हक्कासाठी खा. राहुल गांधी यांच्या नेतृवात देशातील बारा राज्यातून 150दिवस यात्रा चालणार आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर असा एकूण 3500 किलोमीटरचा यात्रेचा प्रवास राहणार असून भारत जोडो यात्रेदरम्यान खा. राहुल गांधी राज्यातील जनतेशी संवाद करीत आहेत. तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कारकर्ते उत्स्फूर्तपणे या यात्रेत सहभागी होतील असे आ. राजेश राठोड यांनी सांगितले.