
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पुणे – नुकत्याच पुणे येथील शिक्षण भवनात व्यवसाय शिक्षण योजनेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात थेरगाव येथील नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे व्यवसाय शिक्षक श्री. संतोष शेंडगे यांना त्यांच्या शाळेतील विविध उपक्रम राबविल्या बाबत तसेच विध्यार्थ्यांना कौशल्यभिमुख विद्यादानाचे कार्य केल्याबद्दल व्यवसाय शिक्षक महासंघाच्या गुणवंत शिक्षक निवड समितीने यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकांने सन्मानित करण्यात आले.
५ व ६ नोव्हेंबर रोजी शिक्षक भवन, पुणे येथे व्यवसाय शिक्षक महासंघ – महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय पदाधिकारी परिसंवाद कार्यक्रमात महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. शोभराज खोंडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील दोन शिक्षकांची यासाठी निवड करण्यात आली होती त्यात मराठवाडा विभागातून श्री. विलास पवार यांच्या कौशल्यभिमुख उपक्रम राबविल्याबाबत तर पुणे विभागातून सोलर वरील ई बाईक ची निर्मिती केल्याबद्दल श्री. संतोष शेंडगे सर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी व्यवसाय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शोभराज खोंडे, महासचिव मंगेश जाधव, कोषाध्यक्ष अनुकेश मातकर, विभागीय अध्यक्ष रोहिदास शिंदे(नाशिक विभाग), अश्विनी हरणखेडे(नागपूर विभाग), निलेश गवई(अमरावती विभाग), संतोष घुबे(मराठवाडा विभाग), प्रशांत पवार(मुंबई विभाग), प्रशांत कोकणे(पुणे विभाग) तसेच राहुल तंबरे, प्रमोद उमरगाकर, कुणाल रावल ,अमृता पठारे सह राज्यभरातून शिक्षक व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.