
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:-८ नोव्हेंबर आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांची २१७ व्या जयंतीनिमित्त आदिवासी क्रांतिकारक चौक जव्हार येथे युवा आदिवासी संघ व सर्व आदिवासी समाज संघटना यांच्या वतीने क्रांतिवीर राघोजी भांगरे व चौकातील सर्व आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवर डॉ.किरण भला नायब तहसीलदार जव्हार,प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष सखाराम पवार सर व युवा आदिवासी संघ माजी अध्यक्ष व पदाधिकारी व आदिवासी समाज संघटना चे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी यांनी यावेळी उपस्थित सर्व आदिवासी बांधवांना आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जीवनप्रवास व त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याविषयी माहिती दिली.
१५ नोव्हेंबर धरती आबा बिरसा मुंडा जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे नियोजन संदर्भात नरेश मराड यांनी उपस्थित सर्व आदिवासी संघटना पदाधिकारी यांना सहभागी होण्याचे आवाहन केले.उपस्थित सर्व आदिवासी बांधवांनी आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करतांना आदिवासी समाज संघटनांचे पदाधिकारी,युवा आदिवासी संघ पदाधिकारी,आदिवासी शिक्षक बांधव,पत्रकार,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी संस्कृती चे सांबाळ वाद्य वाजवून आदिवासी संस्कृती दर्शन घडवून आणले.त्यानंतर जव्हार पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांचा युवा आदिवासी संघ जव्हारच्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यालयात जाऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.