
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे व लोहा तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी कै. बापुराव पाटील हाके यांच्या पुण्यस्मरणा निमित्त मंगरूळ येथे हभप श्री मारोतराव महाराज हिपरगेकर यांचे दि.७-११-२०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान संपन्न झाले.
लोहा तालुक्यात सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे लोहा तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी व शेतकरी तथा जेष्ठ नागरिक कै. बापुराव गंगाराम हाके पाटील यांचे दि. २६-१०-२०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.कै. बापुराव पाटील हाके यांच्या पुण्यस्मरणा निमित्त दि.७-११-२०२२ रोजी हभप श्री मारोतराव महाराज हिपरगेकर यांच्या हरी कीर्तनाचा व गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन माधव पाटील हाके व हाके पाटील परीवार मंगरुळ यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास मंगरूळ, पोलेवाडी , रिसनगाव, माळेगांव सह तालुक्यातील नागरिकांची संख्येने उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धीरज भैया हाके, किरण पाटील हाके, वैभव पाटील हाके व हाके पाटील मित्रमंडळीनी घेतले.