
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा येथील नगर परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी लोहा न.पा. तील तरुण तडफदार सर्वांना सोबत घेऊन चालणारे वैजेनाथ दामोदर शेटे अप्पा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी लोहा न.पा.त कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकी संदर्भात लोहा न.पा. कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदाची बैठक घेण्यात आली.
यावेळी सर्वानुमते वैजेनाथ दामोदर शेटे अप्पा यांची लोहा न.पा. कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी चेअरमन उल्हास राठोड, हरी धुतमल, शेषराव भिसे,माधव पवार, अंकले, शंकर वाघमारे,सोमू केंद्रे, अंजनाबाई गवळी , यांच्या सह सर्व सभासद उपस्थित होते.
लोहा न.पा. कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी वैजनाथ शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्यामुळे त्यांचा सत्कार लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक अमोल व्यवहारे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, राजू पाटील शेटे, पत्रकार बाळासाहेब कतुरे
लोहा नगरपरिषदेचे कर्मचारी वैजनाथ दामोधर आप्पा शेटे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी नगरसेवक नबी शेख नगरसेवक अमोल व्येव्हारे सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार राजु आप्पा शेटे पत्रकार बाळासाहेब कतुरे आदी उपस्थित होते