
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी रत्नागिरी- संभाजी गोसावी . राज्यभर पोलीस उपायुक्त दर्जेच्या १०९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी गृह विभागांने सोमवारी रात्री उशिरा जाहीर केली. तर गेल्या महिन्यांत २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये रत्नागिरीच्या जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यांत आली. तर त्यांच्या रिक्त जागी कर्तव्यदक्ष कोल्हापूर जिल्हा पोलीस दलांतील पोलीस अधिकारी जयश्री तानाजी गायकवाड यांची रत्नागिरी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर नियुक्ती करण्यांत आली. दरम्यान रत्नागिरीत अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून जयश्री देसाई यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. जिल्ह्यांत सायबर गुन्हे प्रकरणी जनजागृती करण्यांत देखील त्यांचा मोठा वाटा होता. देसाई मॅडम यांचा कार्यकाळ रत्नागिरी जिल्ह्यांसाठी उत्कृंष्ट ठरला. तर आता रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये नव्या पोलीस अधीक्षक म्हणून जयश्री गायकवाड मॅडम यांनी या अगोदर रत्नागिरी जिल्ह्यांत चार वर्षांपूर्वी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यावेळी गायकवाड यांच्याकडे पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार होता यामध्ये लांजा व रत्नागिरी तालुक्यांतील प्रत्येकी दोन वर्ष कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे नव्याने येणारे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड मॅडम यांना रत्नागिरी जिल्हा विषयी चांगलीच माहिती आहे. पुन्हा एकदा त्यांची आता रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून जयश्री गायकवाड आता आपल्या पदाचा पदभार लवकरच स्वीकारतील. यावेळी सातारा जिल्ह्यांचे लोकप्रिय आणि पोलीस प्रशासनांचे विद्यमान प्रतिनिधी संभाजी पुरी-गोसावी यांनी सोशल मीडियावरुन जयश्री गायकवाड मॅडम यांच्या अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.