
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली. यंदा विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आगामी मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे.
96 व्या अखिल मराठी संमेलनाची धुरा आता चपळगावकर यांच्याकडे असणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चपळगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, चपळगावकर अखिल भारतीय साहित्य संमेलानाचे अध्यक्षपद हे मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती याबद्दल मत मांडण्यासाठी एक मोठी संधी आहे, असं मी मानतो. ही संधी मला दिल्याबद्दल मी निवड करणाऱ्या सर्वांचे, महामंडळाचे आणि सर्व साहित्य संस्थांचे मी आभार मानतो. या संधीमुळे मराठीची मी आणखी काय सेवा करू शकतो, याचे स्मरण मला करून देण्यात आले आहे. या पदाचा मी सन्मानाने स्विकार करतो, असे चपळगावकर म्हणाले.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आले होत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या ही घोषणा केली होती. २०२१ मध्ये या संमेलनाचे नियोजन नाशिक शहरात प्रस्थावित होतो. २६, २७ आणि २८ मार्च २०२१ असे तीन दिवस साहित्य संमलेन नियोजित होते. “कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले होते. आता अखेर ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा इथे पार पडणार आहे.