
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मुंबई- संभाजी गोसावी.
सध्या देशभरांतील कोट्यावधी लोक मोफत सरकारी रेशनिंगचा लाभ घेत आहेत. मात्र सरकार लाखांचे रेशनिंग बंद करणार आहे. जे लोक सरकारी रेशनिंगचा खोट्या मार्गाने फायदा घेत आहेत अशा देशभरांतील १० लाख बनावट शिधापत्रिका रद्द होणार आहेत. अशा बनावट मार्गाने धान्य घेणाऱ्या शिधापत्रिका लवकरच रद्द करुन त्यांच्या रेशनिंग वर पूर्णपणे बंदी घालण्यांत येणार आहे. तसेच ज्यांची शिधापत्रिका बनावट असेल त्यांच्याकडूंन सरकार रेशनिंग वसूल करेल देशभरांतील ८० कोटीहून अधिक लोक मोफत रेशनिंग कार्डचा लाभ घेत आहेत. पण ही सुविधा घेण्यांस पात्र नसलेले करोडो लोकही देशात आहेत. असे असतानाही वर्षानुवर्ष मोफत रेशनिंग सुविधाचा लाभ घेत आहेत. अलीकडेच सरकारने जवळपास १० लाख अपात्र शिधापत्रिकांची ओळख पटवली होती. ज्यांना यापुढे गहू ,हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार नाही.अपात्र शिधापत्रिका धारकांची यादी शिधावाटप विक्रेत्यांना पाठविण्यांच्या आदेश देण्यांत आले आहेत रेशनिंग विक्रेते चिन्हांकित करतील आणि अशाच कार्डधारकांना अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवला जाईल त्यानंतर त्यांची कार्ड रद्द केली जातील जे लोक मोफत रेशनिंग मिळवण्यांस पात्र आहे त्यांनाच रेशनिंगचा लाभ घेता येणार आहे.