
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी-माणिक सुर्यवंशी.
भारताचे युवा नेते तथा भारत जोडो अभियानांतर्गत भारत यात्राचे जननायक मा.राहुल गांधी हे नुकतेच या यात्रे निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आगमन करत नांदेड जिल्ह्यात येत असताना देगलूर मार्गे शंकर नगर नांदेड या मार्गावरील वनाळी या शाळेतील विद्यार्थ्यी ओमकार अंकमवार व कृतिका भाले या विद्यार्थ्यांना भारताचे युवा नेते मा.राहुलजी गांधी यांनी त्यांची भेट घेऊन अस्तापूर्वक शैक्षणिक चौकशी केली.आणि अभ्यासाविषयी तळमळीने त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या या गावातील आशा वर्कर सौ. शेवाळे मॅडम यांचीही भेट आवश्यक प्रशंसनिय ठरली. भारतातील एवढ्या मोठ्या युवा नेत्यांनी सामान्य माणसाशी नाळ जोडून सर्वसामान्य पर्यंत पोहोचून आस्थापूरक चौकशी करणारे एकमेव नेते आहेत. त्यांनी आपल्या कर्तुत्वांना नेतृत्वाने युवा मनाच्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण केलेली आहे आतापर्यंत कोणत्याही नेत्यांनाच न जमलेलं हे पदयात्रेचे स्वरूप जणू जनआंदोलन रूपामध्ये सर्वत्र पाहायला मिळते. अनेक गावातील नागरिकांनी सामान्य नागरिकांनी दिन दलिताने त्यांच्या या यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.मुलांच्या शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळीच्या या विद्यार्थ्यांच्या भेटीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री वंजे सुरेश,बामणे राजेश, माधव कदम.विठ्ठल वाघमारे,धनाजी मोरे, दिमलवाड सर,दिगंबर खिसे,कलाध्यापक बालाजी पेटेकर,बालाजी बारडवार,सौ.अजली देशमुख,दिलीप पाटील,मारुती अंकमवार,आदींनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.वन्नाळी परिसरातील या विद्यार्थ्यांच्या भेटीने ते उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.