
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आपल्या बेताल वक्तव्यासाठी नेहमीच स्वतःसाठी व पक्षासाठी कारणीभूत ठरतात. वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी जिभेला लगाम न लावता बेताल वक्तव्य करीत असलेल्या अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देगलूर यांच्याकडून करण्यात आली.
संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत वक्तव्य केल्याबद्दल सबंध भारतात त्यांच्या बद्दल निषेध व्यक्त केला जात आहे. महिलांचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान असतो. एकीकडे महिलांचा सन्मान आम्ही करीत आहोत. मात्र दुसरीकडे त्यांच्याबद्दलच बेताल वक्तव्य केली जात आहेत. शिवाय विकृत बुद्धीने ग्रासलेले अब्दुल सत्तारावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देगलूर तालुका, शहर, युवक तथा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. यासंबंधी पोलीस स्थानक देगलूर येथेकार्यवाही संबंधित निवेदन देण्यात आले. या निवेदनावर चंद्रकांत मोरे, शशांक पाटील मुजळगेकर शिवकुमार डाकोरे, साई गंदपवार, विक्रम नागशेट्टीवार, हबीब रहेमान, ओमकार उल्लेवार, अमोल येशमवार, कृष्णा माळेगावकर, भोला जोशी, सुजित सूर्यवंशी, हनमंत शेळके आदींच्या कार्यकर्ते उपस्थित होते.