
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- यंदाचा वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार तालुक्यातील भारतीय विद्यापीठ जव्हार येथे कार्यरत असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका दिपाली ठाकरे-महाले यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाने ठाण्यातील एच.एम हायस्कूल येथे आयोजित केलेल्या या आदर्श शिक्षक पुरस्कार गुणगौरव सोहळ्यात पदवीधर कोकण मतदार संघातील रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील नामवंत शिक्षकांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.कोकण पदवीधर मतदार संघातील या पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका आदर्श शिक्षकाची निवड करून जव्हार तालुक्यातील भारतीय विद्यापीठ इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका दिपाली नरेश ठाकरे-महाले यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वसंतस्मृती आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्यात ठाण्याचे आमदार संजय केळकर,भाजपा प्रदेश सचिव संदीप लेले,विकास पाटील,विनोद भानुशाली,सचिन मोरे यांच्या विशेष उपस्थितीत कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आदर्श शिक्षकांना वसंतस्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.