
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
(बुलढाणा/प्रतिनिधी) :– जीवनात अपेक्षित उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी पराकोटीच्या प्रयत्नांची शर्थ करावी लागते. ज्यावेळी प्रयत्नांच्या पराकाष्ठेतून अपेक्षित उद्दिष्टांची प्राप्ती होते, तो क्षण जीवनातील सर्वात आनंददायी क्षण असतो. असे व्यक्ती जगाचा आदर्श ठरतात. अशा व्यक्तींच्या प्रयत्नांची जगाला ओळख व्हावी, जेणे करुन नियोजनबद्ध प्रयत्नांतून यशाची प्राप्ती लवकर व्हावी व समाजातील सगळ्यांचेच जीवन आनंददायी बनावे या उदात्त हेतूने काही ध्येयवेडे लोक समाजातील गुणवंत, यशस्वी व्यक्तींना सत्काराच्या निमित्ताने उगवत्या पिढीसमोर आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करतात व उगवत्या पिढीला प्रेरणा देऊन उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरित करतात. त्याचवेळी उगवत्या पिढीला उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी समाजातील दीपस्तंभासारखे असणाऱ्या सुजाण व्यक्तींमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी निष्ठेने प्रयत्न करतात.
असाच एक प्रामाणिक प्रयत्न बुलढाणा येथील श्री.राजेंद्रजी वाघ यांनी दि.८ नोव्हेंबर रोजी केला. खामगाव येथील नाभिकरत्न, आदर्श शिक्षक, गणेश राऊत सर, सुरेश राऊत सर, बुलढाणा येथील आदर्श शिक्षक, उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार हभप नामदेवराव खिर्डेकर, खैरा येथील देशसेवेचा वसा घेतलेल्या कुटुंबातील सेवानिवृत्त सैनिक विनोद दिवाकर गणगे, नाभिक समाजात नीट परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवून यशस्वी झालेला व मुंबई येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पहिल्याच फेरीत निवड झालेला चि.प्रणव रविंद्र गणगे आणि अगदीच लहान वयात घरगुती एटीएम मशीन बनवून अख्या महाराष्ट्राला थक्क करुन ‘प्रतिभा सन्मान बालरत्न पुरस्कार’ मिळवणारा चिमुकला वैज्ञानिक चि.आदित्य राजेंद्र वाघ यांच्या गुणांचा गौरव करण्यासाठी सुजाण समाज बांधवांच्या उपस्थितीत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अशा गुणी व उगवत्या पिढीसमोर आदर्श असणाऱ्या गुणवंतांचा सत्कार समाजातील यशस्वी, आदर्श, समाज हिताची जाण असणारे डॉ.सवडतकर, डॉ.राजेंद्रजी गणगे यांच्या हस्ते करण्यात आला. शमान्यवरांच्या आशिर्वादपर, प्रेरणादायी भाषणातून कार्यक्रमाचे उद्दिष्ट सफल झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्रजी गणगे तसेच प्रास्ताविक राजेंद्र वाघ यांनी केले तर अध्यक्षीय भाषणाने समारोप डॉ.राजेंद्रजी गणगे यांनी केला. सदर कार्यक्रमास गणेश राऊत सर, सुरेश राऊत सर, रविंद्रजी गणगे सर, राजेंद्र वाघ, विनोद गणगे, नामदेवराव खिर्डेकर, भागवत आवटे, अनिल जाधव, ज्ञानेश्वर गलबले, मुरलीधर टेंभीकर, जाधव सर, वासुदेव पर्वते, पुरुषोत्तम गणगे, राजु कळमकर, छडीदार सर, प्रशांत राऊत, निलेश शिंदे, कैलास खिर्डेकर, सतीश जाधव, केशव मोतेकर, मोतेकर सर, मोहन प्रभात, प्रकाश सुरडकर, विजय सुरडकर, रमेश वखरे, गणेश पिसे, गणेश गणगे, निलेश वैद्य, श्रीकृष्ण वखरे, गोलु टेंभीकर, गोपाल प्रभात, गणेश शेळके, अभिषेक शेळके, अजय गणगे, श्रीकांत खिर्डेकर, ऋषीकेश वाघ, प्रणव गणगे, आदित्य वाघ, तसेच समाजातील जेष्ठ-श्रेष्ठ, माता-भगिनी व उगवती पिढी उपस्थित होती.