
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी श्री,रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::””’::::’:’:::::”””::::::::::::
आर्णी तालुक्यातील तथा महाराष्ट्रातील सर्वात जास्त गाजलेला व मंजुरी पासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला निम्न पैनगंगा प्रकल्प.
प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या विदर्भ मराठवाड्यातील ९५ गावातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गाजली या सहविचार सभेत अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले .
धरणविरोधी संघर्ष समितीचा लढा लढण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी लढ्यात सामील व्हावे,हा लढताना आमचं जिव जरी गेला तरी आम्ही धरण होऊ देणार नाही,असे मत उपस्थित शेतकऱ्यांनी या सहविचार सभेत मांडले,या लढण्यासाठी आर्थिक मदत पाहिजे ती पण मदत अनेक शेतकऱ्यांनी,धरण विरोधीच्या संघर्ष समितीच्या सदस्याकडे जमा केली, धरण होऊ द्यायचं नाही आणि झाले तरी समृद्धी महामार्गाला जो पैसा मिळालेला आहेत,त्याच दराने शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला सरकारला द्यावा लागेल,त्याकरिता सुद्धा आपल्या सर्व बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना लढा द्यावा लागेल,सरकार अनेक शेतकऱ्यांना पाणी दयावं या उद्देशाने धरण करत आहेत,पण बुडीत क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त होत असल्याची टीका पण अनेक मान्यवरांनी केली,धरण विरोधी संघर्ष समितीचा लढा कायम राहणार असुन, समृद्धी महामार्गाला मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आज पैसा मिळत नाही ,
निम्न पैनगंगा धरण विरोधी समीतीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्यामुळेच कोरडवाहू शेतकऱ्यांना रेडीरेकणरच्या दरापेक्षा पाच पट तथा ओलीताच्या शेतीला दहा पट रुपये देण्यात येत आहे, हा कायदा कोणत्या खासदाराने किंवा आमदारांनी काढला नसून, याचे खरे दावेदार निम्न विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याचं प्रतीक आहे असे मत प्रा.भास्कर इथापे यांनी व्यक्त केले, यावेळी धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, मुबारक तंवर , ऍड.पंजाबराव गावंडे, ऍड. बालाजी येरावार, बाबुभाई फारूकी, डॉ.बाबाराव डाखोरे , प्रकाश गायकवाड , काॅ. शंकर सिडाम,बंडू नाईक,रामकृष्ण पाटील राऊत , प्रल्हादराव गावंडे सर, मिलिंद पाटील शिंदे ,विवेक दहीफळे सह अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.
या सभेला नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुबारक तंवर यांनी
तर विजय समगीर यांनी उपस्थितांचे आभार मानले