
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा
“””””””””””””””””””””””””””””””””””””””
कारखाना प्रशासन व वाहतूक व्यवस्था यांनी अपघात घडणार नाहीत असा तोडगा लवकरात लवकर न काढल्यास मात्र नाईलाजाने का होईना परंतु आंदोलनात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडू नये असा इशारा नागरिकांनी दिल्याचे समजते.
परभणी/पूर्णा : ताडकळस-पूर्णा रोडवरील बळीराजा साखर कारखाना व परिसरात ऊसाने व साखरेने भरलेल्या शेकडो वाहनांच्या पार्किंगची दुतर्फा वर्दळ अनेकांच्या जीवावर बेतला री ठरली जात आहे. कानडखेड ते नांदेड फाटा परिसरात वहातुकीला व रहदारीला अडथळा ठरणारी ही वर्दळ तात्काळ कमी करणे गरजेची आहे अन्यथा कधी कोणाच्या जीवावर बेतली जाईल याचा अंदाज व्यक्त करणे कठीण होऊन बसणारे आहे. आतापर्यंत या परिसरात शेकडो बाईक व अन्य वाहनांचे गंभीर अपघात झाले असून त्यात कित्येक वाहनधारकांना त्या अपघाताची झळ सोसावी लागली आहे. वाहतूक अधिकाऱ्यांनी वेळीच दक्षता घेऊन या परिसरात उभारले जाणाऱ्या वाहनांबाबत योग्य तो मार्ग काढून पार्किंगची व्यवस्था अन्यत्र हलविणे गरजेचे आहे अन्यथा आतापर्यंत झालेल्या शेकडो अपघातांचा विचार करून भविष्यात कधीही नि कित्येकांच्या जीवावर बेतले जाऊ शकेल याची तिळमात्र शंका नाही.
ताडकळस ते पूर्णा या रोडवर कानडखेड परिसरात बळीराजा साखर कारखाना कार्यरत आहे. या कारखान्यावर ऊसाच्या गाळपासाठी ऊसाने खचाखच भरलेल्या शेकडो वाहनांची रांग एका बाजूला असतेतर दुसऱ्या बाजूला कारखान्यातून साखरेचे भरलेल्या दोनशे ते अडीचशे वाहनांची वर्दळ झालेली दिसत असते. दोन्ही बाजूंची ही वर्दळ कानडखेडपासून ते नांदेड फाट्यापर्यंत सततची दिसून येत असते. परिणामी दोन्हीकडून येणाऱ्या अन्य वाहनांना अडथळा ठरला जाऊन त्यात आतापर्यंत शेकडो जणांचे अपघात होऊन त्यात ते वाहनधारक गंभीर जखमी झाले आहेत. कित्येकांच्या जीवावर बेतला रे अपघात होऊनही नशीब बलवत्तर म्हणून जरी बचावले गेले असले तरी भविष्यात तो धोका टाळता येणे अशक्यप्राय असेच आहे. कारखाना परिसरात अपघातांना निमंत्रण देणाऱ्या व जीवावर संकट ओढले जाईल अशा घटना घडूच नये यासाठी वाहतूक अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून पार्किंग केले जाणारी ती वाहने तेथे उभी न करता अन्यत्र कुठेही, जेथे सर्वांसाठी सुरक्षित ठरु शकेल अशा ठिकाणी उभे करण्याची व्यवस्था आखावी जेणेकरून वाहतूकीला अडथळा ठरणार नाहीत व कोणाच्याही जीवावर बेतले जाणार नाही.
साखर कारखाना प्रशासन व वाहतूक पोलीस अधिकारी यांच्या समन्वयातून व सखोल विचार विमर्श करुन नक्कीच तोडगा काढला जावा, अशी नागरिकांची मागणी आहे.