
दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना शहरातील देऊळगावराजा व सिंदखेडराजा कडे जाणारा रस्ता (बायपास) हा कन्हैयानगर मधून जातो, हि जागा वनविभागाची असल्याने या रस्त्यावर रुंदीकरणासह सिमेंट कॉंक्रिट चे काम करण्यास व रस्ता दुरुस्त करण्यास वनविभागाकडून गेल्या दोन अडीच वर्षापासून परवानगी मिळत नव्हती त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत खराब झाला होता. या रस्त्यावरून जाणारी अनेक वाहने कोलमडून पलटी झाली होती, दोन-दोन किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागत होत्या, अनेक वाहनाचे अपघात देखील झाले होते, या अपघातामध्ये चार ते पाच जणांचा बळी या रस्त्याने घेतला होता तर अनेक प्रवाशांना गंभीर इजा पोहचली होती. म्हणून हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा यासाठी कन्हैयानगर भागातील नागरिकांनी व व्यापारी महासंघाच्या वतीने अनेक वेळा आंदोलने केली, उपोषणे केली.
जिल्हाधिकारी तसेच महाविकास आघाडी शासनातील स्थानिक लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने दिली होती. परंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही. महाविकास आघाडी शासनाने आणि महाविकास आघाडी शासनातील स्थानिक नेत्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले व हा प्रश्न सोडविण्यासाठी उदासीनता दाखविली.
परंतु दरम्यानच्या काळात सरकार बदलले व भाजपा-शिवसेना (शिंदेगट) यांचे सरकार सत्तेत आले, त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे एक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी मागील पंधरा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वनविभागाचे नागपूर, औरंगाबाद व जालना येथील अधिकारी, केंद्रातील वनविभागाचे अधिकारी, नेशनल हायवे चे अधिकारी, संबंधित रस्त्याचे गुत्तेदार यांची संयुक्त बैठक बोलावली या बैठकीमध्ये वनविभागामुळे गेल्या एक ते दोन वर्षापासून प्रलंबित पडलेल्या परवानगीच्या प्रस्तावाबाबत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले, सर्व अधिकाऱ्यांना खडसावले, धारेवर धरले आणि मिटिंग संपताच मा.जिल्हाधिकारी यांच्या सह वनविभागाचे अधिकारी, नेशनल हायवे चे अधिकारी, सदरील रस्त्याच्या कामाचे गुत्तेदार या सर्व अधिकाऱ्यांसोबत कन्हैयानगर मधील रस्त्यावर पोहचले आणि रस्त्याची पाहणी केली. सदरील रस्त्याचे गुत्तेदार आणि नेशनल हायवे च्या अधिकाऱ्यांना खडसावले आणि वनविभागाची परवानगी मी मिळवून देतो, परंतु तोपर्यंत सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ चालू करा असे निर्देश दिले, असा दम दिला आणि त्याच दिवशी वनविभागाचे जालना आणि औरंगाबाद येथील सर्व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना परवानगी च्या प्रस्तावामधील त्रुटी ची पूर्तता करण्यासाठी नागपूरला रवाना केले. ह्या सर्व अधिकाऱ्यांनी नागपूर येथील वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये चार ते पाच दिवस थांबून त्रुटींची पूर्तता केली. सदरील रस्त्याचे दोनच दिवसात प्रत्यक्षात दुरुस्तीचे कामही चालू झाले आणि वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता केल्यानंतर दि.११-११-२०२२ रोजी भारत सरकार च्या पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने कन्हैयानगर वन परिक्षेत्रातील ४.२० हेक्टर जमिनीच्या वळतीकरणासाठी वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत नवीन प्रस्तावित असलेल्या ७५३ A जालना-देऊळगावराजा-चिखली-बुलढाणा या रोडच्या कन्हैयानगर भागातील वन परिक्षेत्रातील ४.२० हेक्टर वन क्षेत्राची जमीन वळतीकरणासाठी परवानगी दिली आहे.
या परवानगी मुळे रस्त्याचे रुंदीकरणणासह सिमेंट कॉंक्रिट चे बांधकाम करण्याची अडचण दूर झाली आहे. आणि लवकरच या रस्त्यावरील जुना पूल पाडून तेथे भव्य नवीन पुलासह सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम चालू होणार आहे.