
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
आज दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल खडकी येथे माननीय श्री पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. बाल दिनानिमित्त शाळेमध्ये लहान मुलांसाठी फनी गेम्स व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले तसेच शाळेमध्ये एग्रीकल्चर व टुरिझम हा विषय समग्र शिक्षा अभियान अंतर्गत व्यवसाय शिक्षण म्हणून शिकवण्यात येतो, त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व्यावसायिक बनण्याचे ज्ञान दिले जाते .त्याचाच परिपाठ म्हणून आज शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित फूड फेस्टिवल मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व खाद्यपदार्थ विकून त्यांचे कौशल्य दाखवून नफा कमवला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती. शमशाद नदाफ ,व्यवसाय शिक्षक श्री. प्रशांत कोकणे व श्री. राहुल तंबरे त्याचबरोबर वरिष्ट शिक्षक श्रीमती. लतिफा मोमीन श्रीमती.आफ्रीन मिस श्रीमती. करे मॅडम श्री. रियाज शेख श्री. सुनील पावडे श्री. गोंडला सर तसेच श्रीमती. नाजिया मिस श्री. नसीर सर तसेच श्री. बबन शेळके व श्री. प्रशांत यादव सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.