
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे दिनांक १४ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा काठीपूरा येथून काढण्यात आली.यात्रेचा मार्ग काठीपुरा-तेलीपुरा-पान अटाई-शनिवारा-बुधवारा-माळीपुरा- नेहरू चौक-तहसील रोड-जुने बस स्थानक ते नवीन बस स्थानक येथे विसर्जन असा होता.यादरम्यान यात्रा ही नेहरू चौकातून जात असताना काँग्रेचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा लागतो.विशेष बाब अशी की,नेहरू चौकात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा आहे.त्यासमोरून जात असतांना हारार्पण तर दूरच पण आमदारांनी पुतळ्याजवळ जावून त्यांना वंदन सुद्धा केले नाही.ही बाब अंजनगाव सुर्जी येथील प्रत्येक नागरिकांच्या लक्षात आली.कारण आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती होती व आमदार काँग्रेसचे होते.भारतभरात काँग्रेसचे मा.श्री.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रा सुरू आहे.यामुळे काँग्रेसची चांगली वातावरण निर्मिती होत आहे.पण अशा घटनेमुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो.
यासंदर्भात सुर्जीमधील काँग्रेसचे नेते विदर्भ कुमार बोबडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने १२:०० वाजता पूजन करण्यात आले असल्याकारणाने नेहरू चौकातून यात्रा जात असताना ही बाब आम्ही आमदार बळवंत वानखडे यांच्या लक्षात आणली नाही आणि रॅली वेगाने पुढे निघून गेल्यामुळे आमदार बळवंत वानखेडे पुतळ्याजवळ जाऊ शकले नाही.त्यांचा जयंतीकडे दुर्लक्ष करण्याचा कोणताही उद्देश नव्हता.लवकरच आमदार बळवंत वानखडे हे नेहरूजींच्या पुतळ्या सभोवतालचे सौंदर्यीकरण करणार आहेत आणि निधी मंजूर करण्यात आला आहे.परंतु नेहरू द्रोही समाज कंटकामुळे ते काम लांबणीवर पडले असल्याचे यावेळी काँग्रेसचे नेते विदर्भकुमार बोबडे यांनी सांगितले.