
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
“”””””””””””””””””””””””””””””‘””””””””””””’
आर्णी तालुक्यातील प्रेस क्लबच्या वतीने भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यवतमाळ विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उद्दामपणाचे वर्तन करीत पत्रकारांना दमदाटी करून त्यांना सुपारीबाज संबोधल्याच्या कृतीचा आर्णी प्रेस क्लबच्या पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. यावेळी उपस्थित पत्रकार मंडळीनी भाजप जिल्हा अध्यक्ष व आमदारांच्या भूमिकेवर देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
यवतमाळ भाजपाने शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद आयोजित करून पत्रकारांना निमंत्रित केले होते. पत्रकार परिषदेत पत्रकार बंधूंनी स्वाभाविकच जिल्ह्यातील मंत्री संजय राठोड यांचेवर वाघ यांनी पूर्वी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारले मात्र त्याला नीट उत्तर देण्याऐवजी त्यांचा तोल सुटला, त्यांची प्रस्तावना झाल्यानंतर पत्रकारांनी अडचणीचे प्रश्न विचारूच नये अशा पद्धतीने त्यांचे वर्तन सुरू झाले. सुरवातीपासूनच पत्रकारांना दमदाटी केल्यासारख्या त्या बोलू लागल्या, एव्हढेच नव्हे तर पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, पत्रकार सुपारीबाज आहे अशा बावचळल्या शब्दात त्यांनी पत्रकारांवरच गरळ ओकली. चित्रा वाघ ह्यांची ही मगृरीची भाषा पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक भाजप ने पत्रकारांना निमंत्रित करून पत्रकारांचाच अपमान केला आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला होता. याच अनुषंगाने आर्णी प्रेस क्लब च्या वतीने १४ नोव्हेंबर रोजी पत्रकार बांधवाकडून विश्राम गृह येथे निषेध सभा आयोजित करून चित्रा वाघ ह्यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदविला. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद सोयाम,उपाध्यक्ष राम होले, सचिव प्रशिक मुनेश्वर, गणेश हिरोळे, सचिन चहांदे ,आरिफ शेख,प्रफुल्ल जाधव, रफिक सरकार, नौशाद अली,आसिफ शेख,अविनाश चव्हाण आदि पत्रकार उपस्थित होते.