दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-१४ नोव्हेंबर रोजी भूम शहारत आद्यक्रांतीगूरु,क्रांतिसुर्य क्रांतिवीर लहुजी (वस्ताद) साळवे यांची २२८ वी जंयती साजरी करण्यात आली.
क्रांतिवीर लहुजी (वस्ताद)साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या निमित्त लहुजी शक्ती सेना भूम यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा ता.भूम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेना धाराशिव जिल्हा युवक अध्यक्ष दत्ता साठे,भूम शहर अध्यक्ष अनुरथ कसबे, सुहास तेलंगे,शंकर तेलंगे, विठ्ठल तेलंगे, सखाराम तेलंगे, निखील शिंदे,ईश्वर तेलंगे, सुदर्शन तेलंगे,माधव तेलंगे तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व समाज बांधव उपस्थित होते.
