
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- स्वतंत्र भारत देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून कार्य करणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी इलाहाबाद (प्रयागराज) येथे झाला.नेहरूजींना लहान मुले फार आवडायची तसेच नेहरुजींची जयंती ही देशभरात बालक दिवस म्हणून सुद्धा साजरी केल्या जाते.आज त्यांच्या १३३ व्या जयंती निमित्त नेहरू चौक,सुर्जी अंजनगाव येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेहरूजींच्या प्रतिमेला हारार्पण करून वंदन केले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी विदर्भकुमार बोबडे,अंजनगाव सुर्जी शहराध्यक्ष प्रदिप देशमुख,जहीर बेग,विपुल नाथे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेंद्र अकोटकर,अब्दुल कलीम,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गजानन विजेकर,शिवदास बाप्पू यावले,दिलीप खडगे,सलामुद्धिन भाई,श्रीकांत जूनघरे,मुस्फिक अली,भाजपा चे गणेश पिंगे,संजयभाऊ सरोदे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवी नाथे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गजानन चौधरी,सौरभ दिंडोकार आदी मान्यवर उपस्थित होते.