
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सीन कोळेगाव धरणाच्या मधोमध डोमगाव येथील श्री राम मंदिर व कल्याण स्वामी मठ असलेले , मंदिराच्या भवताली पाणी असे अप्रतिम ठिकाण सध्या पर्यटकांना आकर्षित करत आहे.
भूम:-या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सिना कोळेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरण क्षेत्रात असलेल्या डोमगाव (ता. परंडा) येथील श्रीराम मंदिर, कल्याणस्वामी मठास प्रकल्पातील पाण्याने असा वेढा घातला असून, यामुळे निर्माण झालेले मनोहारी निसर्गदृश्य नजरेत साठविण्यासाठी पर्यटकांची पावले या स्थळाकडे वळू लागली आहेत.निसर्ग सौंदर्य अनेकांना भुरळ घालणारं आहे.सध्या तुम्ही इथल्या निसर्गाच्या आणखी प्रेमात पडायला होतं. स्वर्गीय सुख काय असतं याची अनुभूती तुम्हाला नक्की येईल… एकदा अवश्य भेट द्या.