
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोहा तालुका कार्याध्यक्षपदी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते गजानन पालीमकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून मोहीम सुरू असून त्या अंतर्गत बूथ पातळी पासून जिल्हा पातळीपर्यंत सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्त्यांची पदाधिकारी निवडी करण्यात येत आहेत. लोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नव उभारी देण्यासाठी पक्षातील रिक्त पदे भरणे तसेच नव्या कार्यकर्त्यांना पक्षात नेतृत्व करण्याची संधी देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोहा तालुका युवक कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी गजानन बापूराव पालीमकर यांच्यावर सोपवली असल्याची माहिती युवक तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार पवार यांनी दिली. तसे नियुक्तीपत्र पालीमकर यांना देण्यात आले. निवडीबद्दल जि. प. चे माजी शिक्षण सभापती संजय पाटील क- हाळे, राम पाटील पवार, प्रल्हाद पाटील फाजगे, छत्रु महाराज, मारोती कांबळे, स्वप्निल पांचाळ आधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत गजानन पालीमकर यांना शुभेच्छा दिल्या.