दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाने लोहा तालुक्यात आपली शाखा उघडली आहे. पक्षाच्या लोहा तालुकाप्रमुखपदी धडाडीचे कार्यकर्ते मिलिंद पाटील पवार यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना खा. हेमंत भाऊ पाटील व आ. बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे लोहा – कंधार विधानसभा संघटक पदाचा राजीनामा मिलिंद पाटील पवार यांनी देऊन बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी लोहा -कंधार विधानसभा अध्यक्ष माजी नगरसेवक युवराज वाघमारे, प्रभाकर राऊत यांनी प्रवेश केला होता व त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर पक्षानी जबाबदारी दिली.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या लोहा तालुकाप्रमुख पदी मिलिंद पाटील पवार, लोहा शहर प्रमुखपदी युवराज वाघमारे, लोहा तालुका संघटकपदी प्रभाकर राऊत देऊळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, उपनेते तथा नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.
