
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृती दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने जागोजागी अभिवादन करण्यात आले. कंधार शिवसेनेच्यावतीने शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना तालुका प्रमुख परमेश्वर पाटील जाधव यांनी विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे, उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, नगरसेवक शहाजी नळगे, माजी जि. प. सदस्य संजय भोसीकर, माजी नगरध्यक्ष रामराव पवार, माजी सभापती दिगंबर गायकवाड, राम बनसोडे, देवराव पांडगळे, दत्ता पाटील घोरबांड, शिवकुमार भोसीकर, अजय मोरे, डॉ. बाळासाहेब पवार, युवा तालुका अधिकारी सचिन जाधव, निरंजन वाघमारे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख व्यंकट मोरे,
जेष्ठ शिवसैनिक जी.एम पवळे, प्रल्हाद जाधव, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नितीन कोकाटे, पेठवडज सर्कल प्रमुख प्रदीप मुगावे, फुलवळ गणप्रमुख आनंद राठोड, लक्ष्मण गायकवाड, जगन्नाथ जाधव, केदारनाथ देवकांबळे आदि शिवसैनिक, कॉग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.