दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
एकाच दिवसी अत्याचाराच्या दोन घटना घडल्यामुळे औरंगाबाद हादरलं आहे. 49 वर्षीय महिलेवर आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आले असून, 49 वर्षीय महिलेवर ओळखीच्या व्यक्तीने बळजबरीने बलात्कार केला आहे. पतीची दारू सोडण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला आपल्या घरी बोलवत एकटी असल्याचा फायदा घेत बलात्कार केला आहे. पुंजाराम कचरु दंवगे ( रा. मनूर ता.वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.
याने पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, वैजापूर तालुक्यातील एका गावात त्या आपल्या पतीसोबत रहातात. तर त्यांचे पती आयशर गाडीवर ड्रायव्हर म्हणुन काम करीत असल्याने त्यांना दारूचे व्यसन आहे. तसेच ते गाडीवर चार- पाच दिवस बाहेरगावी जात असतात. त्यांच्या याच दारू पिण्याच्या सवयीमुळे पिढीत महिला वैतागली होती. त्यामुळे आपल्या पतीची दारु सोडविण्यासाठी पीडित महिलेकडून सतत प्रयत्न सुरू होते. दरम्यान महिलेची ओळख आपल्याच तालुक्यातील एका गावातील पुंजाराम कचरु दंवगे याच्यासोबत झाली होती. ओळख झाल्याने अनेकदा बाजारात व इतर ठिकाणी भेटल्यानंतर पीडित महिला आणि पुंजाराम बोलायचे. त्यामुळे एक दिवस बोलतांना आपल्या पतीला दारू पिण्याची सवय असून, ती सोडवण्यासाठी औषध मिळेल का याबाबत देखील पुंजाराम यांच्याशी पीडित महिलेने चर्चा केली.
दुसऱ्या एका घटनेत गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 18 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कन्नड शहरातील सतरा वर्षांच्या मुलीला 22 सप्टेंबर 2021 ते 15 जुन 2022 दरम्यान गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथील 18 वर्षीय तरुणाने गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवार व कन्नड तालुक्यातील मोहडी येथे नेवुन तिच्या मर्जीविरूध्द तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अल्पवयीन मुलीने गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये 17 नोव्हेंबर रोजी याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
