दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा.दवणे..
मंठा. तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा निरोप घेतला आहे. महाराष्ट्रातही परतीच्या पाऊस माघारी फिरला आहे. त्यामुळं सध्या राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात गारठा वाढला आहे. विशेषता मंठा तालुक्यातीथंडीचा जोर चांगला आहे. सध्या उत्तरेकडून थंड आणि कोरडे वारे वाहत आहे. या हवामानामुळं
किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. लहान मोठे सर्वजण ऊबदार कपडे घालून बाहेर पडत आहेत.तसेच गल्लोगल्ली तरुण मंडळी गवत सरपनकाडी, गावऱ्या,टायर,प्लास्टिक पेटून शेकोटीचा आनंद घेत आहे दिवसा दुपारी थंडी झोंबत आहे. परिणामी सकाळी व रात्रीच्या वेळी शेतीचे कामे करताना शेतकऱ्यांना थंडीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे रब्बीच्या पिकाला पाणी देण्यासाठी दिवसा विद्युत पुरवठा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पाणी द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना हुडहुडी चा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.थंडीमुळे गहू, हरभरा ज्वारी हि पिके जोरदार येतील शेतकरी सांगत होते
