दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी जालना-आकाश माने
वाघ्रुळ– जालना तालुक्यातील वाघ्रुळ या गावी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जाफराबाद आगार येथील बस थांबत असते पण काही दिवसापासून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चालू झाला आहे या असल्या कृत्यामुळे गावातील व आजूबाजूच्या गावाचे प्रवासी संतप्त झाले आहे एसटी महामंडळाच्या नियोजित ठिकाणी बस ना थांबवता ५०० मीटर समोर तर कधी मागे थांबवण्याचा प्रकार चालू झालेला आहे १९नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.१५ मी सुमारे जाफराबाद आगाराची एम एच १३सी यू ७५१८क्रमांकाची गाडी जाफराबाद ते पनवेल जाणारी गाडी वाघ्रुळ येथील नियोजित ठिकाणी थांबली नसून प्रवासी गाडीच्या पाठीमागे पळाले असतानी गाडी न थांबल्याने प्रवासी संतप्त झाल्याने जालना आगार प्रमुख यांच्या कडे भागवत खरात यांनी श्री.पैठणे (चालक) सह योगेश चव्हाण (वाहक)ची तक्रार करण्यात आली आहे.
