दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव व जवर्डी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात अनेक दिवसांपासून विज पुरवठा खंडित असल्याने कांदा हे पीक धोक्यात आले आहे.याबाबत सदर शेतकऱ्यांनी वीज वितरण विभाग अंजनगाव येथील अधिकाऱ्यांना आपली समस्या वारंवार सांगितली तरी सुद्धा या शेतकऱ्यांना संबधीत विज वितरण अधिकारी यांनी उडवा-उडवीचे उत्तर दिली.त्यामुळे पिकाला पाणी देता येत नसल्यामुळे कांद्याचं पीक हातून जाईल,अशी चिंता या शेतकऱ्यांना सतावत होती.त्यामुळे त्यांनी आपली समस्या शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांना सांगितली.
शेतकऱ्यांच्या समस्या बाबत नेहणी आक्रमक भूमिका घेणारे गोपाल पाटील अरबट यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या साथ देत,अंजनगाव येथील वीज वितरण कार्यालयात धडकले व शेतकऱ्यांची समस्या मांडत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शेतकऱ्यांना तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करून द्यावा,शिंदे सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये,अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने काम करावं लागेल,असा इशारा जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दिला.या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी श्री.नंदनवशी यांनी लगेच संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन तात्काळ वीज पुरवठा सुरळीतपणे करून देऊ,असे आश्वासन दिले.
याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट,विधानसभा संघटक वैभव भांडे,शहरप्रमुख मुन्ना ईसोकार,योगेश डोबाळे,उपतालुका प्रमुख पंजाबराव नागे,देविदास नेमाडे सोनु रायलकर,श्रीकृष्ण डिके,गणेश गावंडे,सचिन कोरडे,राहुल भुबर,सागर गेठे,विध्यानंद वानखडे आदी उपस्थित होते.
