दैनिक चालू आता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
_____________________________
नांदेड वाचनाची गोडी ही शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या अंगी लावता आली पाहिजे यासाठी पालक आणि शिक्षकांनी अधिक डोळसपणे मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यासाठी पुस्तकाच्या दुकानासमवेत शाळेतील ग्रंथालय व गावातील ग्रंथालयाशी जेवढी जवळीता साधून देता येईल तेवढी द्यावी असे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ककेले
ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते त्यावेळी मसापचे अध्यक्ष प्रभाकर कानड खेडकर ,कवी देविदास फुलारी, डॉक्टर शेंदारकर, धर्मदाय आयुक्त किशोर मसने ,जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सूर्यवंशी, परभणी येथील अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे ,प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी, यांची प्रमुख उपस्थिती होती
या स्पर्धेत 23 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता यात 16 विद्यार्थिनी होत्या हे विशेष
चांगली पुस्तके, ग्रंथ, केवळ ज्ञान देतात असे नाही तर माणूस म्हणून ज्या संवेदना आवश्यक असतात त्या संवेदनाचे पोषणभरनाही ग्रंथ करतात
श्रीमान योगी सारखा ग्रंथ मुलांना वाचून दाखवायला पाहिजे ज्यामुळे जातीय सलोखा सर्वधर्म समभाव ही भावना नव्या पिढीमध्ये वाचन चळवळीतून अधिक समृद्ध होईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगून स्पर्धे त सहभागी झालेल्या स्पर्धक विजेत्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या
यावेळी प्रभाकर कारण खेडकर, डॉक्टर शेंदारकर, किशोर मसने, निळकंठ पांचांगे, यांचे समायोजित भाषणे झाली विद्यार्थ्यांशी त्यांनी सुसंवाद साधला
कार्यक्रमाचा समारोप व आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सूर्यवंशी यांनी मानले
हे विद्यार्थी आहेत स्पर्धेतील विजेते
या स्पर्धेत सहभागी स्पर्धकातून तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय असे विजेते निवडण्यात आले
प्रथम पारितोषिक कुमारी क्रांती पल्लेवाड; द्वितीय वालुताई कुडकेकर; आणि तृतीय पठाण महेक अश्रफ; यांना देण्यात आले उत्तेजनार्थ पारितोषिक कुमारी श्रेया जाधव; कुमारी सुवर्णरेखा पांचाळ; निलोफर शेख ;यांना देण्यात आले परीक्षक म्हणून दिगंबर कदम; निळकंठ पाचंगे यांनी काम पाहिले
हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडावा म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले
