दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा. हिवरखेड येथील ग्रामपंचायत सदस्यांचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की ग्रामसेवक , सरपंच ग्रा.प. हिवरखेडा ता मंठा जि जालना यांच्या १५ व्या वित्त आयोगाच्या खर्च बेकायदेशीर केला आहे त्याची चौकशी करणे व सरपंच, सरपंचाचे नातेवाईक व ग्रामसेवक यांचा चालत असलेल्या मनमानी कारभाराची ‘चौकशी करणे बाबत.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की मौजे हिवरखेडा ग्रा.प. मधील सरपंच व त्याचे नातेवाईक आणि ग्रामसेवक यांनी १५ व्या वित्त आयोगाचे खर्च बेकायदेशीर करण्यात येत आहे. सरपंच हि महिला असून त्यांचे सर्व कामकाज त्यांचे नातेवाईक पाहतात सदरील महिला हि नावापुरती सरपंच आहे. त्याचे सर्व अधिकार त्यांचे घरचे लोक पाहतात. ग्रामपंचायत मध्ये सर्व बेकायदेशीर कामे चालू असल्यामुळे मी रेणुका रमेश राठोड या. प. सदस्य १५ व्या वित्त आयोगाचे कामाची माहिती मागितली असता मला सरपंच यांचे नातेवाईक व ग्रामसेवक हे चुकीती माहिती देतात.
गावामधील स्वच्छतेचि कोणतेही कामे झाली नाहीत. मी सरपंच यांना १५ व्या वित्त आयोग कामाच्या संदर्भात मासिक आढावा बैठकीत माहिती विचारली असता तुम्ही विरोधी सदस्य असल्यामुळे तुम्हाला बैठकीत यायचे किंवा नाही हे अधिकार सरपंच व ग्रामसेवक (आम्हाला आहे) यांना आहे असे सांगितले जाते. तसेच शासनाकडून आलेले परिपत्रक याची माहिती बैठकीत दिली जात नाही.
तरी सर्व कामाची चौकशी करून व्योग्य ती कार्यवाही करावी नसता मी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने अमरणउपोषण करण्यात येईल या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य सौ. रेणुका रमेश राठोड, अनुसया उत्तम चव्हाण. व गावकऱ्यांच्या सह्या आहेत.
