दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
=========================== :
प्रामाणिकपणाची प्रचिती नांदेड मध्ये दिसून आली श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर, नांदेड येथील कॉलेजची 12 वी आर्ट्सची विद्यार्थिनी कुमारी अंकिता पतंगे ही काॅॅलेेज समोरच्या आर.आर.वॉच रिपेरिंग व विक्री या दुकानावरती घड्याळ विकत घेण्यासाठी गेली असता तिने दुकानदार रहेमत नवाज यांना घड्याळ पसंद करून पैसे काउंंरवर ठेवले,खुप गर्दी असल्याने व इंटरव्हल संपल्याची बेल झाल्यामुळे ती घाई गडबडी मध्ये ठेवलेले पैसे ती तसेच विसरून निघून गेली नंंतर तिचा असा समज झाला की पैसे कुठेतरी हरवले आणि ती खूप नाराज झाली परंतु दुसऱ्या दिवशी तिला हाा देऊन बोलावून असे सांगण्यात आली की आपकी घडी और पैसे लेके जाव तेव्हा ती आवाक झाली. तिला खुप आनंद झाला.दुकान मालक रहेमत नवाज यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड सर यांनी रहेमत नवाज
यांच्या आर.आर. वॉच रिपेरिंग या दुकानांमध्ये जाऊन कॉलेजचे पर्यवेक्षक माधव ब्याळे सर व इतर सहकार्यांसोबत रहमत नवाज यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याप्रसंगी प्रा.माधव ब्याळे सरांनी रहमत नवाा यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बोलताना रहमत यांच्यावर त्यांच्या आई-वडिलांनी केलेल्या चांगल्या संस्काराचे हे प्रतीक असल्याचे सांगितले व देशाला अशा प्रामाणिक माणसाची गरज असल्याचेही ते म्हणाले घड्याळ आणि पैसे परत दिल्यामुळे कु. अंकिता पतंगे तिच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू आले होते.
