दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय ‘ ब ‘ झोन मुलींचे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले होते . या स्पर्धेत सहभागी संघातून सर्वप्रथम विजेता संघ महाराष्ट्र महाविद्यालय , उदगीरचा राहीलेला आहे .
उद्घाटन सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , उद्घाटक अखिल भारतीय विद्यापीठ तायक्वाँदो स्पर्धेत कास्यपदक विजेती कु. आशा वडजे , प्रमुख पाहुणे ग्रामीण महाविद्यालय , वसंतनगरचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड , शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजीव डोईबळे , से.नि.क्रीडा संचालक प्रा.व्ही.टी.कोरे , से.नि.क्रीडा शिक्षक शंकरराव मुंढे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते यांची उपस्थिती होती . संघव्यस्थापक प्रा. निहाल खान , प्रा. सतीश मुंढे , प्रा. डॉ शिवानंद पाटील आणि पंच म्हणून प्रा. रोहन इनडले , किशोर जाधव , अंकित जाधव , प्रा. डॉ. बी.टी. पाटील व प्रा.डॉ.टाले यांनी कामगिरी बजावली .
प्रास्ताविक आयोजक तथा क्रीडा संचालक प्रा.डॉ. जयदीप कहाळेकर , सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रसाद जोशी , प्रा.डॉ.विजय वारकड , प्रा.डॉ. मनिषा देशपांडे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. अशोक कुमनाळे यांनी केले . मान्यवरांच्या भाषणात कु.आशा वडजे यांनी स्पर्धा जिंकणे किंवा हरणे हा विषय गौण आहे . मात्र जिवनात खरा खेळ आनंदाने खेळावे असे मत व्यक्त केले . शंकरराव मुंढे यांनी जिवनाचा खेळ चांगल्या पद्धतीने खेळत असायला हवे . खेळातील मुलींचा सहभाग वाढावावा , आपले लक्ष्य साध्य करावं , यश अपयश पचवता आले पाहिजे तरच खेळाडूच्या खेळातून आयुष्यात समाधान मिळत असतो अशी भूमिका मांडले .
प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी मुलीच्या संघाचे उद्घाटन हे महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी कु.आशा वडजेच्या हस्ते होत आहे हे अतिशय अभिमानास्पद घटना आहे . महाविद्यालयाच्या प्रत्येक मुलींसाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरणार आहे . खेळाडूंनी खेळातील बारकावे ओळखुन खेळावे . भविष्यात आपल्यापैकी एखादा तरी खेळाडू जागतिक पातळीवर नावलौकिक करतील , क्रिकेट हा सांघिक खेळ आहे . मोबाईल मुळे सर्वजण सांघिक भावनेपासून दूर होत आहेत . शेवटच्या चेंडू पर्यंत श्वास रोखून धरावा लागतो असे विचार व्यक्त केले . अध्यक्षीय समारोपाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. अडकिणे यांनी संघव्यवस्थापक आणि सहभागी महाविद्यालयाच्या संघाचे स्वागत आणि अभिनंदन केले . एकलकोंडी समाजात सांघिक खेळात सहभागी होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे अशी खंत व्यक्त केली . परंतु खेळाविषयी प्रेम , जागरूकता , आपुलकी ओळखून सहभागी होणारे संघ अतिशय ताकतीने लढत राहतील . हार – जित यापेक्षा खेळातील खाच – खळगे समजून घेण्यासाठी खेळावं अशी भावना व्यक्त केले आणि बक्षीस वितरण समारंभात सर्व संघाचे कौतुक करत स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले .
अतिशय चुरशीच्या या सामन्यात मागील वर्षी आणि याही वर्षी महाराष्ट्र महाविद्यालय , उदगीर चा विजयी संघ विजेता आणि उपविजेता संघ महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड तर तृतीय क्रमांक शिवाजी महाविद्यालय , उदगीर चा संघ पटकावला आहे . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडा निदेशक प्रा.डॉ. संजय गायकवाड , विविध समितीचे प्रमुख व सदस्य , माजी विद्यार्थी कृष्णा जक्केवाड , निखिल कांबळे यांनी प्रयत्न केले .या रोमहर्षक सामन्याचा मनमुराद आनंद प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घेतला आहे .
