दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेड तालुक्यातील उंद्री (प .दे.) येथे श्री खंडोबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 नोव्हेंबर ते 24नोव्हेंबर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री खंडोबा यात्रा महोत्सव समितीने केली आहे.
मुखेड तालुक्यातील उंद्री येथे दरवर्षी मल्हारी म्हाळसाकांत भगवान श्री खंडोबा मंदीराचे वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२रोजी मंगळवारी रात्री ९ वाजता जागरण सोहळा व दिनांक २३ रोजी बुधवारी संध्याकाळी सात वाजता श्री चे पालखी सोहळा व दिनांक २४ रोजी गुरुवारी महाप्रसाद व कुस्तीचा फड आयोजित करण्यात आला आहे तरी नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समस्त गावकरी मंडळी नी केले आहे.
