
दैनिक चालू वार्ता मंठा प्रतिनिधी-सुरेश ज्ञा. दवणे
शासकीय सेवक असल्याचा पडला विसर
शेतकऱ्यांच्या हिताची बातमी लावणी म्हणून पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची धमकी
मंठा – मंठा माझ्या विरोधात बातमी का लावली म्हणत पत्रकावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली शासनाचा व मुख्यमंत्र्याचा आदेश असतानाही हनवतखेड येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची विद्युत प्रवाह तोडणी चालू आहे. याविषयी बातमी प्रकाशित केली होती.
याबाबत दैनिकात बातमी प्रकाशित होताच महावितरण चे इंजिनियर जंगम हे हनतखडे येथे गेले. व माझ्या विरोधात बातमी का लावली असे पत्रकाराला धमकावत तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की दै. देशोन्नती तालुका प्रतिनिधी रवींद्र भावसार व तेज महाराष्ट्राचे तालुका प्रतिनिधी योगेश गणगे यांनी बेलगाम इंजिनियर यांच्या मनमानी कारभाराविषयी बातमी प्रकाशित केली होती.
याचा राग बेलगाम इंजिनियर जंगम यांच्या मनात होता त्यांनी दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधी रवींद्र भावसार यांना वीज महावितरण कार्यालयात बोलून तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताची बातमी लावणी हा जर गुन्हा असेल तर आम्ही केला अशी पत्रकारांनी बेलगाम इंजिनिअर जंगम यांना सांगितले. व तिथून निघून आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन बेलगाम इंजिनिअर जंगम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.