दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:
देगलूर शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालय येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे द्वारा आयोजित शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त तालुका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज तालुका स्तरिय निबंध स्पर्धा 2022 अंतर्गत, गट साधन केंद्र द्वारा आयोजित तालुका स्तरिय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी इयत्ता तिसरी ते पाचवी या वर्गासाठी शाहू महाराजाची एक आठवण,शाहू महाराजांच्या जीवनातील आवडता प्रसंग तसेच इयत्ता सहावी ते आठवी या वर्गासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही-शाहू महाराज,औद्योगिक व कृषी क्रांती-शाहू महाराज या विषयावर ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या वेळी तालुक्यातील 34 शाळेंनी सहभाग नोंदविला होती.सदरील परीक्षेसाठी एकूण 34 विद्यार्थ्यी उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी राजकुमार जाधवर,किशवे आर. पी. (केंद्र प्रमुख पेठामरापूर), विषय तज्ञ सुवर्णकार ओ. जी व साबणे एम. व्ही,वाघमारे एन. के (विशेष शिक्षक) विषय तज्ज्ञ जाधव के . आर ,नाईक डी. एम.,पडलवार सर ,फरकुंडे पी ए मुख्याध्यापक संघाचे यशवंतराव गजभारे (मु. अ),किशन पाटिल (मु. अ)आदी च्या उपस्थितीत ही परीक्षा पार पडली.
