दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा तालुका क्रीडा स्पर्धा 14 नोहें. 18 नोहें रोजी पारपडलेल्या स्पर्धेचा उदघाटन सोहळा न्यू इंग्लिश स्कुल व ज्यु कॉलेज म्हसळा येथे पार पडला या स्पर्धेत 19 वर्ष वयो खालील मुले व 17 वर्ष वयो खालील मुलीच्या संघाने खो-खो या सांघिक खेळात प्रथम क्रमांक 19 वर्ष वयो मुलीच्या संघाने द्वितीय क्रमांकाने यश मिळवले कबड्डी या खेळात मुलींच्या 17 व 19 वयो गटात द्वितीय क्रमांक पटकिवला व्हॉलीबॉल मध्ये 17 वयो मुलीनी प्रथम तर मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवला 19 वयो मुलींनी 4 *100 व 4*400 मी रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकीवाला कु. सुयश सुनील साठे,कल्पेश साळवी, या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. धावणे प्रकारात 100, 1500 मी राज कवणकर, श्रमिक गीते 400, मनीष पाटील 800मी, अमोल बामणे 5000मी सूरज पावशे 3000मी, आदित्य कांबळे 800मी मध्ये यश मिळविले, उंच उडी मध्ये मित दिवेकर प्रथम आला. मुली मध्ये नीती डाऊल चालणे 3किमी, 5किमी प्रथम सानिका साळुंखे भालाफेक महेश चांदोरकर, प्रिती कारभारी, सेजल माळी, तृप्ती दूरे, पूजा दूरे, या विद्यार्थिनीने धावणे प्रकारात यश मिळवले, 17 वयो गटातील निधी गावडे, अनुष्का चव्हाण, हर्षदा माळी, श्रुती भेकरे, सिद्धी कांबळे, प्राची गाणेकर, तुलसी चोरघे, रिया दळवी, यश संपादन केले, 3000मी व 5000मी राणी पाटेकर हिने प्रथम क्रमांक काढला कुस्ती स्पर्धेत, पै. अथर्व नेताजी गायकवाड,पै. विक्रांत खांडेकर, पै नेहल सितप, पै. निरमयी करडे, पै. नीरजा धोत्रे, यांनी प्रथम क्रमांक मिळविला, सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना विद्यालयाचे प्राचार्य हाके पी एल यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले व क्रीडाशिक्षक मोरे सर यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या
न्यू इंग्लिश स्कुल नेवरूळं शाळेचा विद्यार्थी आश्रम पवार यानें लांब उडी या क्रीडा प्रकारात क्रमांक पटकीवला तर शुभम बोर्ले यानें 200 मी धावणे मध्ये क्रमांक मिळविला.
मुख्याध्यापक श्री उमेश मिनेकर, शिक्षक श्री विजय कापसे, श्री हरिश्चंद्र कार्लेकर यांनी विद्यार्थ्यांचे व क्रीडाशिक्षक श्री रविकांत जाधव यांचे अभिनंदन केले.
