दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनीधी- अंगद कांबळे
म्हसळा येथे कार्यरत असलेले श्री भरत पांडुरंग कदम यांची
सन 1996साली प्रथम नियुक्ती कृषी सहाय्यक म्हणून पोलादपूर तालुक्यात झाली .मार्च 1996 ते जून 2002 पर्यंत पोलादपूर तालुक्यातील उत्कृष्ठ सेवा केली. नंतर महाड तालुक्यात सन 2002 ते 2010 पर्यंत कृषी सहाय्यक म्हणून सेवा केली.सन 2011 मध्ये त्यांना कृषी पर्यवेक्षक म्हणून माणगाव येथे बढती मिळाली. सन 2011 ते 2018 पर्यंत माणगाव तालुक्यात कृषी पर्यवेक्षक सेवा केली नंतर सन 2018 मध्ये त्यांची बदली झाली आणि त्यांनी तालुका म्हसळा येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून हजर झाले. दि.18 नोव्हें.2022 रोजी त्यांची मंडळ कृषी अधिकारी महाड म्हणून पदोन्नती मिळाली. तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी वरिष्ठा कडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
