दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
सिरसी बु :- कंधार तालुक्यातील सिरसी बु येथे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.भूपेंद्र बोधनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पशू वैद्यकीय दवाखाना पेठवडज येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.रवी तेप्पावार साहेब, श्री.कदम चँद्रमुनी साहेब, श्री.सचिन सरोदे साहेब,परिचर श्री.भिमराव कांबळे यांनी सिरसी बु येथे जाऊन सरपंच साहेब व ग्रामसेवक यांच्या समवेत लम्पी आजार पूर्णपणे नष्ट करण्यासाठी फवारणी करण्यात आली तसेच गोचीड,डास,गौमासी होणार नाही यासाठी फवारणी करण्यात आली.शासनाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पशू संवर्धन अधिकार्यानी सांगितले.
