दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथील श्री सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थांनच्या वतीने श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दि.07 एप्रिल 2023 ते दि.16 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये होणार आहे.भागवत कथा सप्ताह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. ज्या भाविक भक्तांना या सोहळ्यात सहभागी होणे आहे त्यांनी आपली नावे सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थान येथे नोंदवावी असे आवाहन श्री सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथे श्री सदगुरु नराशाम महाराज यांचे जागृत मठ संस्थान आहे. या मठात संजीवनी समाधी आहे. मठसंस्थांनच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. चार धाम पैकी एक धाम असलेल्या श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथा सोहळ्याचे आयोजन सदगुरु नराशाम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. ज्या भाविक भक्तांना भागवत कथा सोहळ्यात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे मठसंस्थांकडे नोंदवावीत. भाविकांनी आपला आधार कार्ड, दोन रंगीत फोटो आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. भाविकांनी आपली नावे श्री बाळू महाराज जोशी, मठ संस्थान येवती9823209205, श्री दत्तात्रय पाटील टाकळीक9511896552र, श्री पांडुरंग पाटील टाकळीकर9823181245, श्री व्यंकट पदमवार नांदेड9421841164, संतोष महिंद्रकर मुखेड9422874738, राजू पाटील मोकासदरा9404662888,
नंदकुमार दाचावार बाराळी9890974888, महेश घुमशेठवार नांदेड9834144900, संतोष मेडेवार नांदेड9423626651 यांच्याकडे नावे नोंदवावी व भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.
